पुणे: पुणे शहर पोलिसांनी नागरिकांच्या समस्या आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी १४ जून २०२५ रोजी 'तक्रार निवारण दिन' आयोजित केला आहे. या दिवशी शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये सकाळी १०.३० ते दुपारी ०१.३० या वेळेत स्वतः पोलीस उप आयुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यावर कार्यवाही करणार आहेत.
पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी त्यांचे अधिपत्याखालील प्रादेशिक अपर पोलीस आयुक्त, परिमंडळीय पोलीस उप आयुक्त, विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दर शनिवारी 'तक्रार निवारण दिन' आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत.
१४ जून २०२५ रोजी उपस्थित राहणारे अधिकारी आणि संबंधित पोलीस स्टेशन (सकाळी १०.३० ते दुपारी ०१.३० पर्यंत):
ज्या पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस आयुक्त किंवा पोलीस उप आयुक्त नसतील, त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे 'तक्रार निवारण दिना'ची प्रक्रिया पूर्ण करतील. नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांचे तक्रार अर्ज प्रलंबित असल्यास त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहावे.
- -------------------------------------------------------------------------------------------------------------- Public Grievance, Police Initiative, Pune, Law and Order, Citizen Engagement
- #PunePolice, #GrievanceRedressal, #CitizenEngagement, #LawAndOrder, #Pune

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: