पुणे: वारजे माळवाडी परिसरातील आहेरगाव गाव कमानीजवळ दारू न पाजल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून लोखंडी हत्याराने मारहाण करणाऱ्या आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखा, युनिट ३ अंतर्गत वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी यशपाल फुलसिंग भाटी (वय २७ वर्षे, रा. स्वामी पी जी, वारजे माळवाडी, पुणे) आणि राहुल सुखदेव ढवळे (वय २३ वर्षे, रा. वारजे माळवाडी, पुणे) असे आहेत.
दि. ०८/०६/२०२५ रोजी गुन्हे शाखा, युनिट ३ अंतर्गत वारजे माळवाडी स्टेशनकडील बीट मार्शलवरील अंमलदार हद्दीमध्ये गस्त घालत असताना, फिर्यादींनी आहेरगाव गाव कमानीजवळ भेटून त्यांना सांगितले की, त्यांचे मित्र यशपाल भाटी आणि राहुल ढवळे यांनी त्यांना दारू न पाजल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली आहे. तसेच, त्यांच्याकडे लोखंडी हत्यार असून त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीने सांगितले.
या माहितीनंतर, वारजे माळवाडी अंतर्गत रामनगर बीट मार्शलवरील अंमलदार माधव रेवननाथ औताडे, गणेश शिंदे आणि अचानक चौक बीट मार्शलवरील अंमलदार शिवाजी भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे त्यांना यशपाल भाटी आणि राहुल ढवळे यांच्याजवळ लोखंडी हत्यार मिळून आले. त्यानंतर, दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन स्टेशनमध्ये आणण्यात आले. त्यांच्याविरुद्ध वारजे माळवाडी स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर २४३/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ८(२४), भारतीय न्याय संहिता कलम ९९४(R), ३४९(२)(३), ३४२, ३(४), महाराष्ट्र अधिनियम कलम ३०(९)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपर आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहाय्यक आयुक्त (गुन्हे-१) गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ३ चे वरिष्ठ निरीक्षक रंगराव पवार, वारजे माळवाडी स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक विश्वजित काईंगडे, तसेच रामनगर बीट मार्शल अंमलदार माधव रेवननाथ औताडे, गणेश शिंदे आणि अंमलदार शिवाजी भोसले यांनी ही कामगिरी केली आहे.
- --------------------------------------------------------------------------------------------------------------Crime, Assault, Threat, Arrest, Warje Malwadi, Pune, Gang Violence
- #WarjeMalwadiCrime, #Assault, #Threat, #PunePolice, #Arrest

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: