बीड, २५ जून २०२५: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील युसूफ वडगाव हद्दीतील माळेगाव शिवारात पोलिसांनी छापा टाकून तब्बल ३ लाख ९४ हजार रुपये किमतीचा अवैध गांजा जप्त केला आहे. या कारवाईत १९ किलो ७०० ग्रॅम वजनाची गांजाची झाडे ताब्यात घेण्यात आली असून, एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या विशेष पथकाला गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, प्रो. पोलीस उपाधीक्षक पूजा पवार, पोलीस हवालदार बालासाहेब, पोलीस नाईक दिलीप, पोलीस नाईक अनिल, चालक संदीप, आर्टिपीसी विकास, पोलीस नाईक राजू यांच्या पथकाने प्रभारी अधिकारी सपोनी मच्छिंद्रनाथ (वडगाव पोलीस स्टेशन), पोह संपत, पोह सिताराम यांच्यासह माळेगाव शिवारात अचानक छापा टाकला.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, त्यांना दोन फूट ते नऊ फूट उंचीची गांजाची झाडे आढळून आली. सक्षम अधिकारी नायब तहसीलदार भंडारे, शासकीय पंच इंगळे आणि गव्हाणे यांना सोबत घेऊन केलेल्या पंचनाम्यात एकूण १९ किलो ७०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला, ज्याची अंदाजित किंमत ३ लाख ९४ हजार रुपये आहे.
सिद्धेश्वर तुकाराम ठोंबरे (रा. सुरडी, ता. केज, जि. बीड) या आरोपीने बेकायदेशीररित्या गांजाची लागवड करून त्याचे संवर्धन आणि जोपासना केली होती. पोलीस नाईक दिलीप यांच्या फिर्यादीवरून सिद्धेश्वर ठोंबरेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध गांजाची लागवड करणाऱ्यांवर वचक निर्माण होण्यास मदत होईल, असे पोलिसांनी सांगितले.
Drug Bust, Cannabis Seizure, Beed Police, Illegal Cultivation, Police Action, Maharashtra Crime
#BeedPolice #DrugBust #CannabisSeizure #MaharashtraCrime #IllegalDrugs #PoliceAction #Keaj #YuusufVadgaon #CrimeNews
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: