बुधवार पेठेत १२ लाखांहून अधिक किमतीचे मॅफेड्रॉन जप्त; एकास अटक

 


पुणे: पुणे शहर पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक , गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत मोठी कारवाई करत तब्बल १२ लाख १२ हजार ३६० रुपये किमतीचे ५९.४०० ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे.  या प्रकरणी शरणप्पा नागाप्पा कटिमणी (वय ३४ वर्षे, रा. आप्पा दुगड शाळेजवळ, कात्रज, पुणे, मूळ रा. भापर गल्ली, जि. गुलबर्गा, कर्नाटक) याला अटक करण्यात आली आहे.  

दि. १४/०६/२०२५ रोजी, अंमली पदार्थ विरोधी पथक चे  निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. निरीक्षक नितीनकुमार नाईक,  उपनिरीक्षक अस्मिता लाड आणि त्यांचा स्टाफ फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते.  त्यावेळी अंमलदार सय्यद साहिल नजीर शेख यांना मिळालेल्या बातमीवरून, बुधवार पेठ, बाटा बोळ, लक्ष्मी रोड, पुणे येथे छापा घालून शरणप्पा कटिमणी याच्या ताब्यातून हा अंमली पदार्थ आणि काही रोख रक्कम इतर ऐवज जप्त करण्यात आला.  

या प्रकरणी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गु..नं. ११८/२०२५, एन.डी.पी.एस.  अॅक्ट कलम (), २१ () प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

ही कामगिरी  अंमली पदार्थ विरोधी पथक , गुन्हे शाखा, पुणे शहर कडील निरीक्षक   सुदर्शन गायकवाड, सहायक  निरीक्षक नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक अस्मिता लाड, अंमलदार चेतन गायकवाड, मयुर सुर्यवंशी, साहिल शेख, उदय राक्षे, संदिप शेळके, अझिम शेख, योगेश मांढरे, युवराज कांबळे, आझाद पाटील, निलम पाटील, दिशा खेवलकर आणि रविंद्र रोकडे यांनी केली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

 Drug Bust, Mephedrone Seizure, Faraskhana Police, NDPS Act, Pune Crime, Anti Narcotics Cell

 #DrugBust #Mephedrone #PunePolice #Faraskhana #NDPSAct #CrimeNews #AntiNarcoticsCell #Pune   


बुधवार पेठेत १२ लाखांहून अधिक किमतीचे मॅफेड्रॉन जप्त; एकास अटक बुधवार पेठेत १२ लाखांहून अधिक किमतीचे  मॅफेड्रॉन जप्त; एकास अटक Reviewed by ANN news network on ६/१६/२०२५ ०८:५५:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".