डॉ. श्याम मुडे फर्ग्युसन महाविद्यालयाचे नवे प्राचार्य

 


पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे (स्वायत्त) अठरावे प्राचार्य म्हणून डॉ. श्याम मुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण, संशोधन आणि अध्यापनाच्या माध्यमातून भूगर्भशास्त्र या विषयात डॉ. मुडे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

डॉ. मुडे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून भूगर्भशास्त्र विषयात पी.एच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांचे पन्नासहून अधिक शोधनिबंध विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. २०२२ पासून ते फर्ग्युसनच्या भूगर्भशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आयएनएसए (INSA) सायंटिस्ट आणि शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच, सहयोगी संशोधनासाठी त्यांनी तैवानमधील राष्ट्रीय चुंग चेंग विद्यापीठातील पृथ्वी आणि पर्यावरण विज्ञान विभागाला भेट देऊन या संस्थेबरोबर सामंजस्य करार केला आहे.

नवनियुक्त प्राचार्य डॉ. मुडे यांनी आपल्या नियुक्तीबद्दल बोलताना सांगितले की, जागतिक शिक्षण आणि उद्योगांच्या मागणीनुसार कौशल्याधारित अभ्यासक्रम, भारतीय ज्ञान प्रणालीचे सक्षमीकरण आणि जगभरातील विद्यार्थ्यांना फर्ग्युसन महाविद्यालयात सर्वसमावेशक आणि उच्च गुणवत्तेचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने आपण कार्यरत राहणार आहोत.


 Dr. Shyam Mude, Fergusson College, Principal Appointment, Geology, Education, Research, Academic Leadership, Pune, Maharashtra, Deccan Education Society.

 #FergussonCollege #DrShyamMude #Principal #PuneEducation #Geology #AcademicAppointment #HigherEducation #DeccanEducationSociety #PuneNews

डॉ. श्याम मुडे फर्ग्युसन महाविद्यालयाचे नवे प्राचार्य डॉ. श्याम मुडे फर्ग्युसन महाविद्यालयाचे नवे प्राचार्य Reviewed by ANN news network on ६/११/२०२५ ०५:५०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".