लोकजनशक्ती रामविलास पक्षाचे पुणे आयकर विभागासमोर आंदोलन; कर चुकवणाऱ्यांशी सेटलमेंट केल्याचा आयकर अधिकाऱ्यांवर आरोप

 


पुणे: लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) च्या कार्यकर्त्यांनी आज पुण्यातील आयकर विभागाच्या गुलटेकडी येथील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. आयकर इनफॉर्मंट्स रिवॉर्ड स्कीम २०१८ अंतर्गत 'इनफॉर्मंट कोड' मिळविण्याच्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा पक्षाने निषेध केला.

पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष संजय अल्हाट यांनी सांगितले की, "आम्ही आयकर चुकवणाऱ्या व्यक्ती आणि कंपन्यांची विश्वसनीय माहिती दिली असूनही प्रशासन त्वरित कारवाई करत नाही, त्यामुळे आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर दिल्लीतील जंतर-मंतरवर मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल."

आयकर विभागाच्या सॅलिसबरी पार्क (गुलटेकडी) कार्यालयातील मोहित जैन, पीयूषकुमार सिंह यादव आणि आनंद उपाध्याय या अधिकाऱ्यांनी कर चुकवणाऱ्या व्यक्ती आणि कंपन्यांची माहिती पक्षाने दिलेली असतानाही कारवाई केली नाही. त्यांचा हा निष्क्रिय आणि भ्रष्ट कारभार कारणीभूत असल्याचा आरोप करत, त्यांच्यावर केंद्र सरकारने कारवाई करावी, अशी मागणी पक्षाने केली आहे.

याबाबतच्या निवेदनांच्या प्रती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय अन्न व प्रक्रिया मंत्री चिराग पासवान, तसेच आयकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.

या आंदोलनात शहरातील शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. त्यांनी 'इनफॉर्मंट कोड' त्वरित देण्यात यावा, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि भ्रष्टाचारविरोधी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.

यावेळी पक्षाचे कायदेशीर सल्लागार मिलिंद गायकवाड, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अंकल सोनवणे, पक्षाचे पदाधिकारी के.सी. पवार, अमर पुणेकर, आलोक गिरणे, उमेश चव्हाण, विजय अठवाल, दीपक श्रीवास्तव, संजय चव्हाण, सूरज तुपे, आप्पा कोंढाळकर, संभाजीराव खोत, ॲड. अमित दरेकर, रणजित सोनावळे, कुसुम दहीरे, योगिता साळवे, सरचिटणीस नारायणराव भिसे, राहुल उभे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.


 #Pune #IncomeTax #LJP #LokJanshaktiParty #Protest #TaxEvasion #Corruption #Maharashtra #PunePolitics #ChiragPaswan

लोकजनशक्ती रामविलास पक्षाचे पुणे आयकर विभागासमोर आंदोलन; कर चुकवणाऱ्यांशी सेटलमेंट केल्याचा आयकर अधिकाऱ्यांवर आरोप लोकजनशक्ती रामविलास पक्षाचे पुणे आयकर विभागासमोर आंदोलन; कर चुकवणाऱ्यांशी सेटलमेंट केल्याचा आयकर अधिकाऱ्यांवर आरोप Reviewed by ANN news network on ६/०५/२०२५ ०९:३६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".