छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथील पुरवठा निरीक्षण अधिकारी (नायब तहसीलदार) श्रीमती कांचन नामदेवराव कांबळे (वय ३४ वर्षे) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. रास्त भाव दुकानाचे प्राधिकरपत्राचे निलंबन प्रस्ताव मागे घेण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदाराच्या आजोबांच्या नावे असलेले रास्त भाव दुकान क्रमांक २९, मौजे काटेपिंपळगाव, तालुका गंगापूर येथील प्राधिकरपत्राचे निलंबन मागे घेण्यासाठी कांचन कांबळे यांनी १३ जून २०२५ रोजी ७० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ही रक्कम ४० हजार रुपये ठरली.
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर, १४ जून २०२५ रोजी सापळा रचण्यात आला. शासकीय पंच यांच्या समक्ष वस्तू व सेवा कर भवनच्या गेटवर, रेल्वे स्टेशनच्या बाजूला, छत्रपती संभाजीनगर येथे कांचन कांबळे यांनी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारली. लाच स्वीकारताच त्यांना महिला पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्यावर वेदांतनगर पोलीस ठाणे, छत्रपती संभाजीनगर शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७, ७-अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक मुकुंद आघाव, उप अधीक्षक सुरेश ह. नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक वाल्मीक कोरे यांनी केली. त्यांना राजेंद्र जोशी, डोंगरदिवे, सि.एन.बागुल, पुष्पा दराडे, अशा कुंटे यांनी मदत केली.
---------------------------------------------------------------------------------------------------------
Anti-Corruption, Bribery, Sambhajinagar, Government Official, Arrest
#AntiCorruption #Sambhajinagar #BriberyArrest #MaharashtraPolice #ACB
Reviewed by ANN news network
on
६/२०/२०२५ ०८:३४:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: