वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या महिलेला १४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!; डॉ. बिनू वर्गीस यांच्या प्रयत्नांना यश
ठाणे: सामाजिक कार्यकर्ते डॉ. बिनू वर्गीस यांच्या सतर्कतेमुळे एका वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, या प्रकरणी १६ आणि १७ वर्षीय शाळकरी अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. ठाणे पॉक्सो न्यायालयाने सादर केलेले साक्षीदार आणि भक्कम पुरावे ग्राह्य धरून, ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष पोक्सो न्यायाधीश डी. एस. देशमुख यांनी आरोपी महिला दलालाला पिटा कायद्यानुसार दोषी ठरवत १४ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. ही घटना २०२१ मध्ये घडली होती.
गोरेगाव येथील आरे कॉलनीत राहणारी ही ४० वर्षीय महिला गरीब कुटुंबातील इयत्ता १० वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलून त्यांच्यामार्फत स्वतःचा धंदा चालवत होती. याची माहिती डॉ. बिनू वर्गीस यांना मिळताच त्यांनी तातडीने ठाणे समाजसेवा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्याशी संपर्क साधला.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्वरित कारवाई करत डॉ. बिनू वर्गीस यांनाच बनावट ग्राहक बनवून दलाल महिलेपर्यंत पोहोचण्याचा सापळा रचला. दलाल महिलेने मुलींसाठी ५० हजार रुपयांची मागणी केली. डॉ. वर्गीस यांनी पैसे देण्याची तयारी दर्शवताच, ती महिलेने ठाण्यातील साऊथ कोस्ट हॉटेलमध्ये दोन अल्पवयीन मुलींना आणले. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या समाजसेवा शाखेच्या पथकाने दलाल महिलेला रंगेहाथ पकडले.
या खटल्याची सुनावणी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष पोक्सो न्यायाधीश डी. एस. देशमुख यांच्या न्यायालयात झाली. सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगितले की, आरोपी महिलेने गरीब शाळकरी मुलींच्या असहायतेचा गैरफायदा घेतला आणि त्यांना या व्यवसायात ओढले. त्यांनी बनावट ग्राहक आणि परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयासमोर सादर केले.
सबळ पुराव्यांच्या आधारावर न्यायाधीश डी. एस. देशमुख यांनी आरोपी महिलेला दोषी ठरवत शुक्रवारी १४ वर्षांची सक्तमजुरी आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. डॉ. बिनू वर्गीस यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे दोन अल्पवयीन मुलींना सुरक्षित भविष्य लाभले आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Social worker Dr. Binu Varghese rescued two minor schoolgirls, aged 16 and 17, from a prostitution racket in Thane. A female pimp who forced them into the trade was sentenced to 14 years of rigorous imprisonment by the Thane POCSO court. The court considered the presented witnesses and strong evidence in its decision regarding the case that occurred in 2021.
#ChildRescue #ProstitutionRacketBusted #ThanePOCSOCourt #DrBinuVarghese #MinorGirlsRescued #HumanTrafficking #JusticeServed #IndiaNews #CrimeNews #SocialActivism

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: