पिंपरी येथे ऑनलाईन फसवणूक; नऊ लाखांचा गंडा

 


पिंपरी-चिंचवड - पिंपरी येथे एका व्यक्तीला ऑनलाईन फसवणूक करून नऊ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (वय ४९ वर्षे, नोकरी) यांना ९१३८०५२४१२ या मोबाईल नंबरवरून एका अज्ञात व्यक्तीने संपर्क साधला. आरोपीने स्वतःला कंपनीमधील मॅनेजर शरीफ़ इनामदार असल्याचे भासवून फिर्यादीची दिशाभूल केली. त्यानंतर, फिर्यादीच्या आयसीआयसीआय बँक खात्यातून एचडीएफसी बँकेच्या ५०२००१०५२४०५६० या खात्यात ९,००,०००/- (नऊ लाख रुपये) पाठवण्यास सांगितले. अशा प्रकारे फिर्यादीची फसवणूक करण्यात आली.    

या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, महिला पोलीस उपनिरीक्षक धुमाळ तपास करत आहेत.    

--------------------------------------------------------------------------------------------------------

#CyberCrime #OnlineFraud #PuneCrime #FinancialFraud #PimpriChinchwad

पिंपरी येथे ऑनलाईन फसवणूक; नऊ लाखांचा गंडा पिंपरी येथे ऑनलाईन फसवणूक; नऊ लाखांचा गंडा Reviewed by ANN news network on ६/०४/२०२५ ०६:५६:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".