पुणे, २१ जून २०२५: आंतरराष्ट्रीय योग दिन (२१ जून) आणि जागतिक संगीत दिन एकाच दिवशी आल्याचे औचित्य साधून, पुण्यातील टिळक रोडवरील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या पूर्व प्राथमिक मुरलीधर लोहिया मातृमंदिर शाळेत 'संगीत योगा' कार्यक्रमाचे अनोखे आयोजन करण्यात आले. यावर्षी पुण्यात पालख्यांचा मुक्काम असल्याने, पालक, विद्यार्थी आणि वारकरी यांनी एकत्र येऊन योगा दिन उत्साहात साजरा केला.
या उपक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी वारकऱ्यांसाठी तिखट, मसाले, वरई (भगर) आणि स्वच्छतेच्या वस्तू इत्यादी भेट म्हणून आणल्या होत्या. सर्वांनी योगासने केल्यानंतर, माऊलींच्या नामघोषात नवी पेठ विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष शंकरराव निवंगुणे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांच्या हस्ते या भेटवस्तू वारकऱ्यांना सुपूर्द करण्यात आल्या.
या कार्यक्रमाला श्री. प्रशांत सुर्वे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच माजी अध्यक्ष श्री. बाळासाहेब काळभोर आणि समीर पवार यांची विशेष उपस्थिती होती. शिक्षिका प्रियांका शेंडकर, अमृता महाबळेश्वरकर आणि रती काळभोर यांनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या आणि आनंदात पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांसाठी अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
Pune, Tilak Road, Muraleedhar Lohia Matrumandir School, Sangeet Yoga, Warkari, International Yoga Day, World Music Day, Parents, Students, Interfaith, Donation, Spices, Varai, Cleaning Supplies, Shankar Rao Nivangune, Madhuri Barve.
#Pune #YogaDay #MusicDay #Warkari #MatrumandirSchool #SocialService #CommunityHarmony #PandharpurWari #YogaWithWarkaris

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: