देहूरोड: देहूरोड येथे एका महिलेची 'फेडएक्स कस्टमर केअर'च्या नावाने सायबर फसवणूक करत २० लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०९/०९/२०२४ पासून ते दि. ०४/०६/२०२५ पर्यंत घर नं. १७/०१, ८३७ त्रिमुर्ती सोसा., फॉरेस्ट हिल जवळ, साईनगर, मामुर्डी, देहूरोड, पुणे येथे ही घटना घडली. फिर्यादी महिलेच्या मोबाईल फोनवर ९२३०७४४८६९ या क्रमांकावरून 'फेडएक्स कस्टमर केअर'मधून बोलत असल्याचे सांगून फोन आला. फिर्यादीचे एक पार्सल इराणमध्ये जात होते आणि त्यात एक्स्पायर्ड पासपोर्ट, लॅपटॉप, मेडिसीन आणि ४५० ग्रॅम एम.डी.एम.ए. ड्रग्ज मुंबई एअरपोर्टला जप्त केले असल्याची धमकी देण्यात आली.
यावर तुमच्या नावावर गुन्हा दाखल करणार अशी भीती दाखवून, सरकारी अधिकाऱ्यांची नावे सांगण्यात आली. फिर्यादीच्या मोबाईलमधील ICICI बँकेच्या (२३३८०१५००९३७) खात्यावर असलेल्या 'I' मोबाईल ॲपमधून त्यांना स्वतःच्या नावावर २० लाख रुपयांचे पर्सनल लोन घ्यायला लावले. ते लोनचे पैसे SBI बँकेच्या (४३३०८१२६४७१) 'भारत इंटरप्रायजेस' नावाच्या खात्यावर भरण्यास सांगून महिलेची २० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात अज्ञात इसम आणि बँक खातेधारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे पुढील तपास करत आहेत.
- ---------------------------------------------------------------------------------------------------------#CyberFraud, #OnlineScam, #DehuroadPolice, #FinancialCrime

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: