रविवार, १ जून, २०२५

थेरगाव येथे चप्पल विक्रेत्याला मारहाण



थेरगाव: थेरगाव येथे मितवा फुट वेअर दुकानाजवळ चप्पल विक्रेत्याला मारहाण करण्यात आली. 

विजय रामा वाबळे (वय ३५), राहुल नारायण कांबळे (वय २२), रविनारायण कांबळे (वय २७) आणि सिद्धार्थ राजेश वाघुळे (वय २१) यांनी तुषार अशोक तरटे यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. 

आरोपी विजय वाबळे याने घेतलेली चप्पल तुटल्याचे कारण देत वाद घातला. आरोपी राहुल कांबळे याने फिर्यादीच्या डोक्यात काठीने मारून जखमी केले. 

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक मेटे तपास करत आहेत.

  • ------------------------------------------------------------------------------
  • #Crime #Assault #Pune #Theft #Thergaon

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा