दापोडीत दारूच्या नशेत लष्करी हवालदारावर हल्ला; पोलीस आरोपीच्या शोधात

 


पिंपरी चिंचवड: दापोडी येथील सी एम ई फोर्समध्ये दारूचे प्राशन करून गोंधळ घालणाऱ्या एका व्यक्तीने लष्करी हवालदाराच्या शासकीय गणवेशाला फाडून शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे.

या प्रकरणी हवालदार उत्तमकुमार कन्हैयासिंह (वय ३८ वर्ष, लष्करी हवालदार, नं १५३४८६४४ एच, रा. सी एम ई फोर्स दापोडी आर पी सेक्शन एडीएम विंह सी एम ई, मूळ रा. महापुर पो.स्टे.नोखाता, सासाराम, जि. रोहतास, बिहार) यांनी तक्रार दिली आहे. आरोपी अर्जुसिंग अतरसिंग (वय २० वर्ष, रा. सी एम ई फोर्स दापोडी पुणे) अद्याप फरार आहे.

दि. ०८/०६/२०२५ रोजी रात्री १०:१५ वाजण्याच्या सुमारास सी एम ई फोर्स दापोडी पुणे येथे ही घटना घडली. आरोपी अर्जुसिंग अतरसिंग याने दारूचे प्राशन करून उलटी केली होती आणि गोंधळ घालत होता. फिर्यादी उत्तमकुमार कन्हैयासिंह त्याला समजावून सांगत असताना आणि त्याची झडती घेत असताना, आरोपीने फिर्यादीला 'तू मेरा क्या उखाड लेगा, तुझे बाद में दिखातु हु, तुम आर पी वाले कुछ नही कर पाओगे' असे म्हणत शिवीगाळ केली. त्याने फिर्यादीच्या शासकीय गणवेशाला, शर्टाच्या उजव्या खांद्यावरील शोल्डर धरून फाडून टाकले आणि अंगावर धावून येऊन त्याचा बलप्रयोग केला. फिर्यादी शासकीय कर्तव्य पार पाडत असताना, त्याच्या शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण केला.

या प्रकरणी दापोडी स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक १०४/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १३२ (सार्वजनिक सेवकावर हल्ला), महाराष्ट्र (मुंबई) दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ८५(१) (सार्वजनिक ठिकाणी नशा करणे) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास उपनिरीक्षक कांबळे   करत आहेत.

  • --------------------------------------------------------------------------------------------------------------- Assault, Public Servant, Intoxication, Obstruction of Justice, Pimpri Chinchwad, Dapodi, Crime
  •  #AssaultOnDuty, #DapodiCrime, #PimpriChinchwad, #PublicServant, #Intoxication
दापोडीत दारूच्या नशेत लष्करी हवालदारावर हल्ला; पोलीस आरोपीच्या शोधात दापोडीत दारूच्या नशेत लष्करी हवालदारावर हल्ला; पोलीस आरोपीच्या शोधात Reviewed by ANN news network on ६/११/२०२५ ०८:१५:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".