दरोड्याच्या तयारीत असलेले चौघे अटकेत; १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

 


भिवंडी: शांतीनगर पोलिसांनी दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या चार तरुणांना अटक केली आहे. या कारवाईत चार गावठी अग्निशस्त्रे, एक बीएमडब्ल्यू कार आणि विविध हत्यारे असा एकूण १७ लाख ३५ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शोएब शाहीद शेख (वय २३), नौशाद मक्खुद आलम खान (वय २२), अफताब अफसर शेख (वय २१, मूळ रा. दरभगा, बिहार) आणि शहाबुद्दीन अलीमुद्दीन अन्सारी (वय २०) यांचा समावेश आहे. शांतीनगर स्टेशनमधील शिपाई प्रशांत बर्वे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली.

शांतीनगर स्टेशनचे तपास पथक गस्त घालत असताना, चाविंद्रारोड, भिवंडी येथील शानदार मार्केट परिसरातील मोकळ्या मैदानाजवळ एमएच०२, बीझेड ५६७१ या क्रमांकाच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये पाच संशयित व्यक्ती हत्यारे व अग्निशस्त्रे घेऊन कोणताही गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून बसल्या असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून तपास पथकातील अधिकारी सुरेश चोपडे व अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संशयित कारमध्ये बसलेल्या चार आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या तपासणीत घातक शस्त्रे व इतर साहित्य मिळून आले.

आरोपींच्या ताब्यात लोखंडी कटावणी, लोखंडी रॉड, दोरखंड, तीन कपड्यांचे मारक, मिरची पूड, चार जोड हॅन्डग्लोज, चाकू, सेलो टेप, मोबाईल, दोन देशी बनावटीचे कट्टे आणि दोन देशी बनावटीचे पिस्तूल असे एकूण चार अग्निशस्त्रे, तसेच बीएमडब्ल्यू कार असा एकूण १७ लाख ३५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. या प्रकरणी शांतीनगर स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ६५४/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१०(४), ३१०(५) सह आर्म्स अॅक्ट ३, २५ सह महाराष्ट्र अधिनियम कलम ३७(१), १३५ तसेच मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ३/१८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

  • ------------------------------------------------------------------------------------------------------------
  • Crime, Robbery Attempt, Arrest, Arms Seizure, Bhiwandi, Thane, Police Action
  •  #BhiwandiCrime, #RobberyAttempt, #ArmsSeizure, #ThanePolice, #Arrest
दरोड्याच्या तयारीत असलेले चौघे अटकेत; १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त दरोड्याच्या तयारीत असलेले चौघे अटकेत; १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त Reviewed by ANN news network on ६/०७/२०२५ ०५:२५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".