पुणे: पुणे शहरातील बुधवार
पेठेत वेश्या व्यवसायाच्या आडून
'मॅफेड्रॉन' (एम.डी.) या
अंमली पदार्थाची तस्करी
करणाऱ्या एका महिलेला पुणे
शहर गुन्हे शाखेच्या अंमली
पदार्थ विरोधी पथक
२ ने १७
जून २०२५ रोजी
अटक केली आहे.
ज्योती सुनील यादव
उर्फ कटिमणी (वय
५०, रा. कात्रज,
पुणे) असे अटक
केलेल्या महिलेचे नाव असून, ती
या गुन्ह्यातील मुख्य
सूत्रधार असल्याची माहिती पोलिसांनी दिली
आहे.
या
प्रकरणी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये दाखल
असलेल्या गु.र.नं.
११८/२०२५, एन.डी.पी.एस.
अॅक्ट कलम ८
(क), २१ (क),
२९ नुसार तपास
सुरू होता. तपासादरम्यान, यापूर्वी अटक
केलेला आरोपी शरणप्पा नागाप्पा कटिमणी
(वय ३४, रा.
कात्रज, पुणे, मूळ
रा. गुलबर्गा, कर्नाटक) याने
एम.डी. हा
अंमली पदार्थ त्याची
बहिण ज्योती सुनील
यादव उर्फ कटिमणी
हिच्याकडून विक्रीसाठी पुरवल्याचे निष्पन्न झाले.
तपासात
पुढे आले आहे
की, अटक केलेली
महिला आरोपी ज्योती
यादव हीच मागील
दोन वर्षांपासून बुधवार
पेठेतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना आणि
ग्राहकांना मॅफेड्रॉन (एम.डी.) या
अंमली पदार्थाची विक्री
करत होती.
ही
कारवाई पुणे शहर
पोलीस आयुक्त अमितेश
कुमार सह आयुक्त
रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त,
गुन्हे, पंकज देशमुख,
उप-आयुक्त, गुन्हे,
निखिल पिंगळे, आणि
सहा. आयुक्त, गुन्हे-२, राजेंद्र मुळीक
यांच्या मार्गदर्शनाखाली
करण्यात आली. अंमली पदार्थ
विरोधी पथक २,
गुन्हे शाखा, पुणे
शहर कडील निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा
निरीक्षक नितीनकुमार नाईक, उप-निरीक्षक अस्मिता लाड
व स्टाफ चेतन
गायकवाड, संदिप जाधव, मयुर
सुर्यवंशी, साहिल शेख, उदय
राक्षे, संदिप शेळके,
अझिम शेख, योगेश
मांढरे, युवराज कांबळे,
आझाद पाटील, निलम
पाटील, दिशा खेवलकर,
रविंद्र रोकडे यांनी केली.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------Pune Police , Anti-Narcotics Cell, Drug Trafficking, Mephadrone (MD), Budhwar Peth, Prostitution Racket, Female Arrest, Crime News, Pune City.
#PunePolice #DrugBust #MDDrugs #BudhwarPeth #AntiNarcotics #PuneCrime #MaharashtraPolice #DrugTrafficking #CrimeNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: