मुंबई, २७ जून २०२५: उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कामगार सेनेचे माजी सरचिटणीस डॉ. प्रशांत काकडे यांनी शुक्रवारी आपल्या अनेक समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये (भाजप) प्रवेश केला. भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला.
यावेळी भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आणि सुहास माटे उपस्थित होते. डॉ. काकडे यांच्यासोबत कामगार सेनेच्या शेखर पवार, वर्षा माळी, विजय हरिहर, बाबुलाल पुजारी या कार्यकर्त्यांनी, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस नेते गिरीश मसुरकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
कामगार हितासाठी भाजपमध्ये प्रवेश
रवींद्र चव्हाण यांनी डॉ. काकडे यांचे स्वागत करताना सांगितले की, डॉ. काकडे हे कामगार क्षेत्रातील धडाडीचे कार्यकर्ते आहेत. विमानतळ सेवा क्षेत्रात विदेशी कंपन्यांना बंदी घालण्याची मागणी डॉ. काकडे यांनी पूर्वीपासून केली होती. मात्र, उबाठा सेनेने या मागणीकडे दुर्लक्ष केले. पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सरकारने विमानतळ सेवा क्षेत्रात परदेशी कंपन्यांना बंदी करण्याचा निर्णय घेतला.
कामगार हितासाठी मोदी सरकार आणि फडणवीस सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे डॉ. काकडे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असे चव्हाण यांनी नमूद केले. डॉ. काकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कामगार हितासाठीच्या मागण्या सरकारकडून मान्य करण्यासाठी भाजप संघटना पूर्णपणे प्रयत्न करेल, असे आश्वासनही रवींद्र चव्हाण यांनी दिले.
डॉ. काकडे यांचा ३५ वर्षांचा अनुभव
डॉ. प्रशांत काकडे हे उबाठा सेनेत गेली ३५ वर्षे विविध पदांवर कार्यरत होते. शिक्षण आणि कामगार क्षेत्रात त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. पक्षाच्या विविध आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.
BJP, Shiv Sena (UBT), Dr. Prashant Kakade, Political Entry, Labor Leader, Ravindra Chavan, Airport Services, Foreign Companies Ban, Maharashtra Politics
#BJP #MaharashtraPolitics #PrashantKakade #ShivSenaUBT #PoliticalEntry #LaborLeader #ModiGovernment #RavindraChavan #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: