पुणे, दि. २: भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'प्रेमाच्या गावा जावे' हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम शनिवार, दि. ७ जून २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता येथे होणार आहे. 'शुभांगी मुळे, पुणे' हे या कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत.
'प्रेमाच्या गावा जावे' मध्ये प्रेमाचे विविध रंग उलगडणाऱ्या मनोहारी गीतांचा समावेश आहे. शुभांगी मुळे, हेमंत वाळुंजकर आणि अविनाश सलगरकर हे लोकप्रिय गीते सादर करतील. त्यांना जयंत साने (हार्मोनियम), तुषार दीक्षित (सिंथेसायझर), मोहन पारसनीस (तबला) आणि हेमंत पोटफोडे (तालवाद्य) हे कलाकार साथ देणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन नीना भेडसगावकर करणार आहेत.
भारतीय विद्या भवन पुणे केंद्राचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रसिकांसाठी या कार्यक्रमात विनामूल्य प्रवेश आहे. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित होणारा हा २४७ वा कार्यक्रम आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------- #PuneEvents #CulturalProgram #MarathiSongs #LoveSongs #FreeEvent #IndianVidyaBhavan #InfosysFoundation
Reviewed by ANN news network
on
६/०२/२०२५ ०३:५२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: