मच्छरनाशकांची निवड योग्य आणि जबाबदारीपूर्वकच असायला हवी

 


डेंग्यू, चिकनगुनिया आणि मलेरियासारख्या डासांमुळे माणसाच्या जीवाला धोका निर्माण होतो. लहान मुलांना या आजारांचा जास्त धोका संभवतो. लहान मुलांची रोगप्रतिकारकशक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसल्याने त्यांना या आजारांची लागण होणार नाही यासाठी फार काळजी घ्यावी लागते.

पावसाच्या आगमनानंतर हे आजार बळावण्याची शक्यता वाढते. अनेक घरांमध्ये डासांपासून स्वतःचा आणि कुटुंबीयांच्या बचावासाठी मच्छरनाशक वापरले जातात. मात्र, या मच्छरनाशकाच्या वापराबद्दल बरीच संभ्रमावस्था आहे. बऱ्याच जणांना मच्छरनाशक योग्यरित्या वापरता येत नाही. मच्छरनाशकाच्या वापराबद्दलच्या शंका आणि गैरसमजुतीमुळे अनेकजण याचा वापर करणे टाळतात. डासांपासून संरक्षण करण्यासाठी बाजारात एरोसोल, लिक्विड व्हेपोरायझर्स आणि अगरबत्ती असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या उत्पादनांचा योग्य वापर कसा करावा ही माहिती घेणेदेखील महत्त्वाचे ठरते.

योग्य डास प्रतिबंधक उत्पादनाची निवड करा

प्रत्येक डास प्रतिबंधक उत्पादनाचा वापर वेगवेगळ्या गरजेनुसार केला जातो. घरातल्या डासांपासून त्वरित सुटका हवी असेल तर एरोसोल स्प्रे उपयुक्त ठरतो. संध्याकाळच्या वेळी घरात कोणीही नसेल त्यावेळी हा स्प्रे वापरावा. या स्प्रेच्या वापराने डास लगेचच मरतात. रात्री लहान मुलांना डास फार चावतात. यावेळी लिक्विड व्हेपोरायझर्स चांगला पर्याय ठरतो. ही सर्व उत्पादने योग्य वेळी वापरल्यास डासांच्या चाव्यापासून संरक्षण मिळते.

एरोसोल स्प्रेचा योग्य वापर कसा करावा

हिट या उत्पादनासारखे एरोसोल स्प्रे प्रभावी असले तरीही त्याचा योग्य पद्धतीने वापर व्हायला हवा. घरात कोणीही नसेल त्यावेळी या स्प्रेचा वापर करावा. स्प्रे केल्यानंतर लगेचच घरातून बाहेर पडा. १५-२० मिनिटानंतर घरात जा. बेडजवळ, खाद्यपदार्थांजवळ, लहान मुलांच्या खेळण्याच्या ठिकाणी स्प्रेचा वापर करू नये. स्प्रेचा वापर करण्यापूर्वी लहान बाळाची किंवा मुलांची काळजी घ्या. स्प्रे हवेत पसरल्यानंतर त्यांना त्रास होतो त्यामुळे सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

सरकारमान्य लिक्विड व्हेपोरायझरची निवड करा

केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समितीने मान्यता दिलेल्या लिक्विड व्हेपोरायझर, कॉइलचा वापर करावा. संबंधित संस्था या उत्पादनांची सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या करतात. तुम्ही उत्पादनाच्या पॅकेजिंगवर छापलेला सीआयबीआरसी क्रमांक पाहून मान्यताप्राप्त उत्पादन ओळखू शकता. गुड नाईट लिक्विड व्हेपोरायझर हे लहान मुलांसाठी सुरक्षित उत्पादन मानले जाते. या उत्पादनावर ठळकपणे सीआयबीआरसी क्रमांक नमूद केलेला आहे. लिक्विड व्हेपोरायझरचा जबाबदारीने वापर करा. डासांपासून स्वतःचे आणि कुटुंबीयांचे संरक्षण करा. सुरक्षित आणि सरकारी मान्यताप्राप्त उत्पादनांना प्राधान्य द्या.

लिक्विड व्हेपोरायझरचा योग्य वापर करण्याची पद्धत

झोपण्याआधी अर्धा तास अगोदर लिक्विड व्हेपोरायझरचा वापर करा. खोलीतील खिडकी आणि दरवाजे थोडे उघडे ठेवावे. हे उपकरण लहान मुलांच्या हाताला लागणार नाही अशा सॉकेटमध्ये लावा. आजकाल रेनोफ्लुथ्रिनसारख्या नवीन रेणूंचा वापर करणारे व्हेपोरायझर उपलब्ध आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रेनोफ्लुथ्रिनची भारतात निर्मिती करण्यात आली आहे. रेनोप्लुथ्रिन हे सर्वात प्रभावी पर्यायांपैकी एक मानले जाते. अशा व्हेपोरायझरचा वापरही प्रभावी ठरतो.

रेपेलंट्सची साठवणूक करण्याची पद्धत

तुम्ही कोणत्या प्रकारचा रेपेलंट वापरता त्यावर या उत्पादनाची साठवणूक पद्धत ठरते. ही उत्पादने लहान मुलांना हाताला लागणार नाही अशा इंच ठिकाणी किंवा बंद कपाटात ठेवावी. ही उत्पादने मुलांना कधीही हाताळायला देऊ नका. जर तुम्ही प्लगमध्ये लावणारे उपकरण वापरत असाल तर वापर नसताना अनप्लग ठेवण्याकडे कटाक्षाने लक्ष द्या. गळती किंवा इतर अपघात टाळण्यासाठी ही उत्पादने नेहमी सरळ ठेवा.

बेकायदेशीर मॉस्किटो रिपेलेंट धूप काड्यांचा वापर टाळा

कंफर्ट, रिलॅक्स, स्लीपवेल, जस्ट रिलॅक्स, रिलीफ किंवा नॅचरल रिलॅक्स यांसारख्या अगरबत्त्यांचा वापर टाळायला हवा. या अगरबत्त्या अनेकदा बेकायदेशीररित्या आयात केलेल्या असतात. या अगरबत्त्यांमध्ये हमखास सरकारी मान्यताप्राप्त संस्थांनी मज्जाव केलेली रसायने वापरली जातात. त्या स्वस्त असल्या तरीही त्यांच्या गुणवत्तेची हमी नसते. या रसायनांमुळे तुमच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो. याऐवजी विश्वासार्ह ब्रॅण्डचे आणि सीआयबीआरसीची मान्यता असलेले रिपेलेंट निवडा, जेणेकरून सुरक्षितता आणि परिणामकारकता दोन्हीची खात्री मिळेल.

मच्छरनाशकांची निवड योग्य आणि जबाबदारीपूर्वकच असायला हवी मच्छरनाशकांची निवड योग्य आणि जबाबदारीपूर्वकच असायला हवी Reviewed by ANN news network on ६/०१/२०२५ ०२:४२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".