खराबवाडीत भाडेकरूच्या चौकशीवरून दुकानदाराच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला, तिघे अटकेत

पिंपरी-चिंचवड, दि. ४ जून: दुकानातील भाडेकरूच्या ॲग्रीमेंटबद्दल विचारणा केल्याच्या रागातून तीन जणांनी मिळून दुकानदाराच्या वडिलांवर फावडे, दांडके आणि पाईपने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. २) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील खराबवाडी येथील सारा सिटी परिसरात घडली. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

काय आहे घटना?

अभिजीत सुनील चौगुले (वय २६, रा. दुर्गामाता मंदिर जवळ, सहारा सिटी, खराबवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ते आणि त्यांचे चुलत भाऊ शेखर राजू चौगुले हे त्यांच्या दुकानासमोर बसले होते. त्यावेळी त्यांचे वडील सुनील चौगुले हे कामगारांकडून दुकानासमोर साफसफाई करून घेत होते. इतक्यात आरोपी सतीश मुकुंदा चौगुले (वय ५७), जगदीश सतीश चौगुले (वय ३८) आणि एक ५२ वर्षीय महिला (सर्व रा. दुर्गामाता मंदिर जवळ, सहारा सिटी, खराबवाडी) तेथे आले.

आरोपींनी फिर्यादीच्या वडिलांना, "तुला जास्त माज आला आहे काय?" असे विचारले. त्यावर फिर्यादीच्या वडिलांनी, "तुम्ही आमच्या गाळ्यामधील भाडेकरूला किती महिन्यांचे ॲग्रीमेंट केले आहे, असे का विचारले? तुमचा संबंध काय?" असे म्हटले. याचा राग आल्याने आरोपी सतीश चौगुले याने "मी तुला जिवंत सोडणार नाही," असे म्हणून शिवीगाळ करत फिर्यादीच्या वडिलांच्या डोक्यात आणि कपाळावर फावड्याने मारहाण केली. आरोपी जगदीश चौगुले याने दांडक्याने मारहाण केली, तर महिला आरोपीने पाईपने मारहाण करून फिर्यादीच्या वडिलांना गंभीर जखमी केले आणि त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

आरोपींना अटक, तपास सुरू

या हल्ल्यानंतर अभिजीत चौगुले यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काळे करत आहेत.

------------------------------------------------------------------------------------------------

 #PimpriChinchwadCrime #MahalungePolice #AssaultCase #AttemptToMurder #Kharabwadi #PuneCrime #Arrested


खराबवाडीत भाडेकरूच्या चौकशीवरून दुकानदाराच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला, तिघे अटकेत खराबवाडीत भाडेकरूच्या चौकशीवरून दुकानदाराच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला, तिघे अटकेत Reviewed by ANN news network on ६/०४/२०२५ ०४:००:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".