पुणे: विश्रांतवाडी परिसरात अज्ञात चोरट्यांनी एका घरात घुसून १ लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कडी-कोयंडे उचकटून आत प्रवेश केला आणि बेडरूममधील लोखंडी कपाटातून दागिने लंपास केले.
याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
------------------------------------------------------------------------------------------------------------- #HouseBurglary #Theft #PuneCrime #VishrantwadiPolice #JewelryTheft

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा