पुणे: पुणे स्टेशन पोलीस चौकीसमोर ब्रिजजवळ एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. सिद्धार्थ नामदेव गवारे, वय ५२ वर्षे, रा. जेलरोड, नाशिक रोड, नाशिक असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात वाहन चालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात वाहन चालवले. त्यामुळे गवारे यांना धडक बसली आणि ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चालक घटनास्थळी न थांबता, अपघाताची माहिती न देता पळून गेला.
याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
-------------------------------------------------------------------------------------------------------
#HitAndRun #RoadAccident #PunePolice #Bundgarden #TrafficViolation

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा