देहूत छत्रपती शंभुराजे जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर; ५० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 


देहू: छत्रपती शंभुराजे यांच्या ३६८ व्या जयंतीनिमित्त देहू येथे अजिंक्यतारा सोसायटीतील सभासदांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सालाबादप्रमाणे यावर्षी सलग पाचव्या वर्षी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

शिबिराचे उद्घाटन देहू नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम आणि उपमुख्याधिकारी सौ. प्रियांका कदम यांच्या हस्ते झाले. पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्त ह.भ.प. श्री शिवाजी महाराज मोरे यांनी शंभुराजे यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

याप्रसंगी डॉ. प्रवीण निकम आणि श्री विकास कंद यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि रक्तदान शिबिरास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुभाष पाटील यांनी केले. शिबिराला रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून जवळपास ५० जणांनी रक्तदान केले.

यावेळी श्री नाना काळोखे, श्री सचिन पवार, श्री आप्पा माने, श्री अमोल गाडेकर, श्री विकास बोराडे, श्री संग्राम पाटील, श्री शरद मेथे आणि श्री कुलदीप होले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

---------------------------------------------

#देहू 

#छत्रपतीशंभुराजे 

#रक्तदानशिबिर 

#अजिंक्यतारासोसायटी 

#नगरपंचायत 

#रक्तदान 

#Dehu 

#ChhatrapatiShambhuraje 

#BloodDonationCamp 

#AjinkyataraSociety 

#NagarPanchayat 

#BloodDonation

देहूत छत्रपती शंभुराजे जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर; ५० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देहूत छत्रपती शंभुराजे जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर; ५० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद Reviewed by ANN news network on ५/१६/२०२५ १०:१५:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".