हिंजवडी, दि. २३: हिंजवडी पोलिसांनी मुंबई-पुणे महामार्गावरील सूर्या अंडरपास ब्रिजखाली केलेल्या कारवाईत मेफेड्रॉन (एम.डी.) या अंमली पदार्थांची तस्करी उघडकीस आणली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ६८ ग्रॅम मेफेड्रॉन, दोन मोबाईल आणि एक मोपेड दुचाकी असा एकूण ९ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सहायक पोलीस उपनिरीक्षक नरेश अनंतराव बलसाने यांच्या नेतृत्वाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनच्या पथकाने ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अक्षय पप्पु देडे (वय २८, रा. सर्वे नं. ११०, कॉटर व्हील, शारदाबाई वामन शाळेच्या बाजूला, रामटेकडी हडपसर पुणे) आणि राहुल सनी देवरे (वय २२, रा. सर्वे नं. ११०, कॉटर व्हील, शारदाबाई वामन शाळेच्या बाजूला, रामटेकडी हडपसर पुणे) अशी आहेत.
आरोपींकडून विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या मेफेड्रॉन बाळगण्यात आले होते. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पांचाळ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
----------------------------------------------------------------------------------------------
#HinjawadiCrime #DrugTrafficking #MDSeizure #PunePolice #Arrests

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: