वाघोलीत ऑनलाईन फसवणूक; शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली २१ लाखांचा गंडा
पुणे, दि. २३ मे २०२५: वाघोली परिसरात एका २२ वर्षीय व्यक्तीची ऑनलाईन माध्यमातून २१ लाख २१ हजार ५१५ रुपयांची फसवणूक झाली आहे. अज्ञात मोबाईल धारकाने ट्रेडिंग ॲपच्या माध्यमातून शेअर बाजारात आणि आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे आमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला थोडा परतावा देऊन नंतर मोठी रक्कम गुंतवण्यास सांगून ही फसवणूक केली.
या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१९ (२) (फसवणूक), ३१८(४) (बेईमानीने मालमत्ता हडपणे), ३(५) (गुन्हेगारी कट) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. युवराज हांडे (मो.नं. ८२७५२००९४७) या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपी मोबाईल धारकाचा शोध सुरू आहे, अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.
-------------------------------------------------------------------------------------------------
#OnlineFraud #CyberCrimePune #FinancialScam #WagholiCrime #PoliceInvestigation #MaharashtraNews
Reviewed by ANN news network
on
५/२४/२०२५ ०८:०७:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: