उरणमध्ये आर. एस. लुईस यांना भावपूर्ण निरोप


उरण: न्यू मॅरिटाईम ॲण्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी बामर लॉरी लिमिटेडच्या उरण प्रकल्पातील एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आर. एस. लुईस यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान केला. हा सोहळा मंगळवारी (ता. १३) पार पडला.

गेल्या १४ वर्षांपासून आर. एस. लुईस यांनी न्यू मॅरिटाईम ॲण्ड जनरल कामगार संघटनेला चांगले सहकार्य केले. त्यांनी कामगारांप्रती नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आणि अनेक कामगारांना संधी दिली. आता आर. एस. लुईस यांची पदोन्नती झाली असून ते लवकरच कोलकाता येथील प्रकल्पात डायरेक्टर (बिझनेस सर्विसेस) म्हणून रुजू होणार आहेत.

या पार्श्वभूमीवर, महेंद्रशेठ घरत यांनी उरण येथील प्रकल्पात त्यांची भेट घेतली. त्यांनी लुईस यांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सन्मान केला आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी बामर लॉरीचे अधिकारी राजेश राघवन, परशुराम भोईर, लंकेश ठाकूर, मनोहर ठाकूर, अजित ठाकूर, मनीष ठाकूर, संदीप वर्तक, सचिन भोईर, रवींद्र ठाकूर, जयेन ठाकूर, कल्पेश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. 

-------------------------------------------------

#उरण #कामगार #सत्कार #महाराष्ट्र #Uran #Workers #Felicitations #Maharashtra

उरणमध्ये आर. एस. लुईस यांना भावपूर्ण निरोप उरणमध्ये आर. एस. लुईस यांना भावपूर्ण निरोप Reviewed by ANN news network on ५/१६/२०२५ ०७:२५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".