पुणे - स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशस्वी करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. 'डीईएस पुणे युनिव्हर्सिटी' आणि 'चाणक्य मंडल परिवार' यांच्या संयुक्त विद्यमाने 'स्पर्धा परीक्षांद्वारे करिअर' या विषयावर एका मोफत करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा रविवार, २५ मे २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता फर्ग्युसन कॉलेजच्या अँफीथिएटरमध्ये होणार आहे.
या विशेष मार्गदर्शन सत्रात, प्रशासकीय सेवेतील अनुभवी आणि चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक-संचालक अविनाश धर्माधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या सत्रात यूपीएससी, एमपीएससी आणि इतर विविध स्पर्धा परीक्षांची ओळख करून दिली जाईल. तसेच, या परीक्षांच्या तयारीची योग्य दिशा, अभ्यासाचे तंत्र आणि महत्वाच्या टिप्स यावर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'डीईएस पुणे युनिव्हर्सिटी' मध्ये 'चाणक्य मंडल परिवार'च्या सहकार्याने 'बीए सिव्हिल सर्व्हिसेस अँड पब्लिक पॉलिसी' आणि 'एमए पब्लिक पॉलिसी' हे यूजीसी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांविषयीची माहिती देखील मेळाव्यात दिली जाईल.
दहावी, बारावी आणि पदवीचे शिक्षण घेत असलेले तसेच स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात येऊ इच्छिणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक या मार्गदर्शन मेळाव्याचा लाभ घेऊ शकतात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे, परंतु नावनोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ०८०६९०१५४५४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
------------------------------------------------------------------
#CareerGuidance #CompetitiveExams #UPSC #MPSC #Pune #FreeSeminar #AvinashDharmadhikari #DESUniversity #ChanakyaMandal

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: