हा कार्यक्रम शनिवार, २४ मे २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात होणार आहे.
चित्रकार आणि बंदिशकार भाग्यश्री गोडबोले यांनी रामायणातील विविध प्रसंगांवर आधारित बंदिशी (गाणी) तयार केल्या आहेत. या कार्यक्रमात, विविध गायक या बंदिशी सादर करतील आणि त्याच वेळी भाग्यश्री गोडबोले यांनी काढलेली चित्रं रसिकांना पाहायला मिळतील.
पंडित अमोल निसळ, डॉ. सानिका गोरेगावकर, सावनी दातार, श्वेता कुलकर्णी आणि भाग्यश्री गोडबोले हे प्रसिद्ध गायक विविध रागदारीतील रचना सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. सुनील देवधर करणार आहेत, तर अमित जोशी (तबला), शुभदा आठवले (संवादिनी) आणि अंजली सिंगडे-राव (व्हायोलिन) त्यांना साथ देणार आहेत.
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा हा २४५ वा भाग आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य आहे, अशी माहिती भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकीर्डे यांनी दिली आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------
Reviewed by ANN news network
on
५/१९/२०२५ ११:४९:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: