पुणे, १७ मे २०२५: शहरातील औंध परिसरात अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराचे कुलूप तोडून ११,२०,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० मे २०२५ ते १३ मे २०२५ दरम्यान ही चोरी झाली.
फिर्यादी महिला केसरी रोड, औंध येथील '12B विनोद अपार्टमेंट' मध्ये राहतात. त्या काही दिवसांसाठी बाहेरगावी गेल्या होत्या. परत आल्यावर त्यांना घराचे मुख्य दारुण कुलूप तुटलेले दिसले. आत जाऊन पाहणी केली असता बेडरूममधील कपाटातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
चतुःशृंगी पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची तक्रार दाखल करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे सुरू केले आहे.
-------------------------------------------------------------
#PuneCrime #Burglary #Theft #GoldJewelry #ChaturshrungiPolice

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा