'आनंद तरंग – भावविश्व मनाचे' : हार्मोनियम आणि व्हायोलिनच्या सुरावटीतून भावगीतांचा नजराणा
पुणे: भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत 'स्वरगंध, पुणे' प्रस्तुत 'आनंद तरंग – भावविश्व मनाचे' हा विशेष कार्यक्रम शनिवार, ३१ मे २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, शिवाजीनगर येथे रंगणार आहे.
या कार्यक्रमात रसिकांना हार्मोनियम आणि व्हायोलिनच्या सुमधुर जुगलबंदीतून मनातील विविध भावनांना स्पर्श करणाऱ्या लोकप्रिय मराठी आणि हिंदी गीतांचा आनंद घेता येणार आहे. या संगीत मैफिलीत माधवी करंदीकर (हार्मोनियम), डॉ. नीलिमा राडकर (व्हायोलिन), अभिजीत जायदे आणि जितेंद्र पावगी (तबला), राजेंद्र साळुंखे (तालवाद्य) आणि डॉ. अमित करकरे (संवादक) हे सिद्धहस्त कलाकार आपली कला सादर करतील.
भारतीय विद्या भवन पुणे केंद्राचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार मालिकेतील हा २४६ वा कार्यक्रम आहे, जो रसिकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव असेल.
----------------------------------------------------------------
#Pune #Music #BharatiyaVidyaBhavan #InfosysFoundation #AnandaTarang #Bhavgeet #Madhavikarandikar #NeelimaRadkar #FreeProgram

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: