पुणे: ‘२०२५ या वर्षी मे महिन्यात (अतिवृष्टी) मॉन्सूनपूर्व मोठ्या पावसाचा अनुभव येईल, जनजीवन विस्कळीत होईल, ही सर्व भाकिते दिवाळी २०२४ मध्ये वर्तविली होती, ती अचूक ठरल्याचे स्पष्ट झाले आहे,’ असा दावा मेदिनिय ज्योतिष शास्त्राचे अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी केला आहे. आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी हा दावा केला आहे.
२०२४ च्या ‘ज्योतिषज्ञान’ दिवाळी अंकातून ही भाकिते वर्तविण्यात आली होती. यंदा मान्सून वेळेवर आणि अपेक्षेप्रमाणेच सक्रिय होणार असून, १ जून रोजी केरळमार्गे त्याचा प्रारंभ होणार आहे, २० मे ते ८ जून मोठा पाऊस पडणार आहे. २ ते ७ जून अतिवृष्टी होईल, १६ जून ते १५ जुलै काळात चांगली पर्जन्यवृष्टी होईल, २ ऑगस्टनंतर पाऊस कमी होईल. परतीचा पाऊस २० सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर दरम्यान होईल, असे मारटकर यांनी ‘ज्योतिषज्ञान’ दिवाळी अंकात भाकीत वर्तवले आहे.
या संदर्भात मारटकर यांनी पत्रकात म्हटले आहे की, ‘मेदिनिय ज्योतिष हे भारतीय पारंपरिक खगोलशास्त्रावर आधारित असून, त्यात पर्जन्य काळातील ग्रहस्थितीचा अभ्यास करून हवामानाचे अंदाज वर्तविले जातात. सूर्याचे राशी प्रवेश व नक्षत्र प्रवेश कुंडलीवरून मे ते ऑक्टोबर पूर्ण पर्जन्यमानाचे भाकीत ६ महिने आधीच वर्तविले आहे. त्याचा अनुभव प्रत्येक वर्षी वाचकांना येत असून शेतकरी वर्गालाही या भाकीताचा फायदा होत आहे. हा अभ्यास दिवाळीतच प्रसिद्ध केला होता. सलग पडलेल्या पावसामुळे आमच्या अंदाजांची पुष्टी झाली आहे, ही मेदिनिय पद्धतीची वैधता सिद्ध करणारी गोष्ट आहे,’ असेही ते म्हणाले.
‘या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्रातील शेतकरी आणि हवामान अभ्यासक यांच्यात प्राचीन भारतीय पद्धतीच्या हवामान अंदाजांकडे नव्याने लक्ष वेधले जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानासोबतच परंपरागत ज्ञानाची सांगड घालून अधिक अचूक आणि स्थानिक हवामान भाकिते करता येऊ शकतील,’ असा विश्वासही मारटकर यांनी व्यक्त केला आहे.
सिद्धेश्वर मारटकर हे ‘ज्योतिष ज्ञान’ मासिकाचे संपादक असून युद्ध, क्रिकेट, हवामान आणि राजकारण संबंधी त्यांची अनेक भाकिते खरी ठरली आहेत. मारटकर यांनी वर्तविलेल्या अचूक भाकीताची नेहमी अनेक मान्यवर आणि प्रसारमाध्यमे यांच्याकडून दखल घेतली जात आहे. ज्योतिषशास्त्र हे भविष्यातील घडामोडींचा किती अचूक वेध घेऊ शकतो याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे बोलले जात आहे.
------------------------------------------------------------------------------------------------
#Pune #WeatherForecast #Astrology #SiddheshwarMaratkar #HeavyRainfall #Maharashtra #India

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: