पिंपरी, दि. २३: पिंपरी चिंचवड शहरातील खराळवाडी परिसरात एका कार्यालयातील लेटरहेड चोरी करून त्यावर बनावट सही करत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुरुष (वय ३२, रा. लांडेवाडी भोसरी) यांच्या भक्ती कॉम्प्लेक्समधील शॉप नं. २९/३० या कार्यालयातून आरोपी क्रमांक १, प्रसाद महादेव दांडगे (वय ३४), दुसरी महिला आरोपी (वय ३१), तिसरी महिला आरोपी (वय ५५, सर्व रा. चक्रपाणी वसाहत भोसरी), चौथा आरोपी राजेश जयसिलान वेणुगोपाल (वय ३५, रा. सर्व्हे नं. २०/२अ, भालेकर नगर, पिंपळे गुरव), आणि पाचवा आरोपी गोपीनाथ बालाजी दांडगे (वय ३४, रा. विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ, सुभाष लांडे चाळ, भोसरी गाव) यांनी संगनमत केले.
आरोपी प्रसाद दांडगे याने फिर्यादी यांच्या ओळखीचा फायदा घेत त्यांच्या कार्यालयातील लेटरहेड चोरले. त्यानंतर त्यावर बनावट सही करून फिर्यादी यांच्या फर्मच्या नावाने तसेच खाजगी सुरक्षा अभिकरण परवाना, जीएसटी क्रमांक आणि पॅन क्रमांकाचा गैरवापर केला. या माध्यमातून आरोपींनी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, पवना सहकारी बँक आणि झोलो प्रॉपर्टीज स्टेट यांना सुरक्षा पुरवण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार १ ऑगस्ट २०२२ ते ११ जुलै २०२४ दरम्यान घडला.
याप्रकरणी संत तुकाराम नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
------------------------------------------------------------------------------------------
#PimpriChinchwadCrime #FraudCase #Forgery #PoliceInvestigation #MaharashtraNews
Reviewed by ANN news network
on
५/२३/२०२५ ०३:१०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: