जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मच्छिमारांना तातडीचे आवाहन; समुद्रातून किनाऱ्यावर परतण्याचे निर्देश
रत्नागिरी, दि. २३: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यात येत्या २२ मे ते २६ मे दरम्यान किनारी भागात आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने २२ मे रोजी दिलेल्या अंदाजानुसार, या काळात ४५-५० किमी प्रतितास ते ५५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे २३ मे रोजी रात्रीपर्यंत समुद्र खवळलेला राहील, तर २४ मे ते २६ मे दरम्यान समुद्र अधिक खवळलेला राहण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जे मच्छिमार सध्या समुद्रात मासेमारीसाठी गेले आहेत, त्यांनी सुरक्षिततेसाठी २३ मे पर्यंत किनाऱ्यावर परत यावे, असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे. संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी देखील सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
--------------------------------------------------------------------------------
#RatnagiriRainAlert #HeavyRainfall #StrongWinds #FishermenSafety #MaharashtraWeather #IMDAlert #DisasterManagement #Ratnagiri #WeatherWarning
Reviewed by ANN news network
on
५/२३/२०२५ ०८:२८:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: