न्यायालयाने आरोपीला २ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली
पुणे: वाघोली पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने लोहगाव परिसरात केलेल्या कारवाईत गांजा विक्री करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ८ किलो ४०२ ग्रॅम वजनाचा गांजा आणि एक मोबाईल असा एकूण १,६९,३४०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई २८ मे २०२५ रोजी करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक मनोज बागल आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पथक लोहगाव चौक परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार समीर भोरडे यांना अभिषेक लॉनजवळ लोहगावकडे जाणाऱ्या रोडवर एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत बॅग घेऊन जाताना दिसली.
त्यानुसार पोलिसांनी स्टाफच्या मदतीने सदर व्यक्तीची चौकशी केली आणि त्याच्या बॅगची तपासणी केली. तपासणीत बॅगेत ८ किलो ४०२ ग्रॅम गांजा आणि एक मोबाईल फोन आढळून आला. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव सुरेश साहेबराव पाटील असून त्याचे वय ४४ वर्षे आहे. तो मूळचा हिसाळे, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे येथील रहिवासी आहे.
याप्रकरणी वाघोली पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. २२१/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट, कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला २९ मे २०२५ रोजी अटक करण्यात आली असून, मा. न्यायालयाने त्याला ०२ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक बागल करत आहेत.
ही कामगिरी अपर आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर,मनोज पाटील, उप-आयुक्त परिमंडळ ४, पुणे शहर, हिम्मत जाधव,सहा.आयुक्त येरवडा विभाग, पुणे शहर श्रीमती प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ निरीक्षक वाघोली पोलीस ठाणे युवराज हांडे, सहा.निरीक्षक विनायक आहिरे, तपास पथकाचे उप-निरीक्षक मनोज बागल, आणि अंमलदार रामचंद्र पवार, संदीप तिकोणे, प्रदीप मोटे, नामदेव गडदरे, विशाल गायकवाड, समीर भोरडे, मंगेश जाधव, पांडुरंग माने, साई रोकडे, सालके, आसवले, प्रशांत धुमाळ, शिवाजी चव्हाण यांनी केली आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------#PunePolice #DrugSeizure #WagholiPolice #Cannabis #Arrest #CrimeNews #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा