पिंपरी: टाटा मोटर्स आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या संयुक्त उपक्रमामुळे २४ युवकांना नामांकित कंपनीत रोजगाराची संधी मिळाली आहे. या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या युवकांना तीन वर्षांचे व्यावसायिक प्रशिक्षण, मानधन आणि इतर सुविधा मिळणार आहेत.
टाटा मोटर्स आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांनी पिंपरी येथील लाईटहाऊस केंद्रात विशेष नोकरी मेळाव्याचे आयोजन केले होते.
प्राथमिक निवड झालेल्या उमेदवारांनी लाईटहाऊसचा फाउंडेशन कोर्स पूर्ण केला.
या उमेदवारांना नेटूर टेक्निकल ट्रेनिंग फाउंडेशन (एनटीटीएफ) च्या माध्यमातून तीन वर्षांचे मॅन्युफॅक्चरिंग डिप्लोमा प्रशिक्षण, दरमहा १६ हजार रुपयांपर्यंत मानधन आणि कॅन्टीन व वाहतूक सुविधा मिळणार आहेत.
हा उपक्रम ‘कौशल्यम – लाईटहाऊस प्रकल्पा’ अंतर्गत आयोजित करण्यात आला होता.
-----------------------------------------------------
#TataMotors #Lighthouse #Employment #JobFair #PimpriChinchwad #Maharashtra #SkillDevelopment
Reviewed by ANN news network
on
५/१६/२०२५ ०४:२१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: