पुणे: केसनंद येथे एका ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १८ मे २०२५ रोजी सकाळी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६३ वर्षीय ट्रक चालक जनार्दन बाबुराव चव्हाण याने अपना मेडिकल केसनंद गाव चौकाजवळ वाहतूक नियमांचे उल्लंघन करून, निष्काळजीपणे आणि वेगात ट्रक चालवला. त्यामुळे ५२ वर्षीय रामदास गायकवाड, जे दुचाकीवरून प्रवास करत होते, त्यांचा गंभीर अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झाला.
तपासात असे उघड झाले की, ट्रक चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना नव्हता, तरीही ४७ वर्षीय वाहन मालक संतोष भंडारे यांनी त्याला वाहन चालवण्याची परवानगी दिली होती. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
या प्रकरणाचा तपास वाघोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैजिनाथ केदार (मो.नं. ८१०४०६६७१६) करत आहेत.
----------------------------------------------------------------------------------------
#Pune #Accident #Death #Negligence #TrafficRules #Crime #Kesanand #RoadAccident

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा