पुणे - महागड्या घड्याळांच्या शोरूममधून एकाच कर्मचाऱ्याने संगनमताने १४ लाखांहून अधिक किंमतीची घड्याळे चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. लष्कर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सी.टी. पंडोल अँड सन्स या घड्याळांच्या शोरूममधील एका कर्मचाऱ्याने आपल्या ओळखीच्या इसमाशी संगनमत करून, एप्रिल २०२५ मध्ये विविध तारखांना डिलिव्हरी चलनाद्वारे कोणतीही किंमत अदा न करता १४,३१,१०० रुपये किंमतीची पाच राडो व लॉन्जिन्स कंपनीची महागडी घड्याळे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरून नेली आहेत.
या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल दांडगे हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा