कुटुंबियांची तक्रार; पोलिसांकडून विशेष पथक निर्माण
पुणे : हडपसर येथील सातववाडी परिसरात एका २३ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना १९ मे रोजी घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्नाटकमधील गुरुसंगप्पा म्यागेरी (वय ५३) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी दीपा उर्फ देवकी प्रसाद पुजारी (वय २२) ही तिच्या पतीसोबत सातववाडी येथे राहत होती. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, मुलीच्या पतीसह दीर आणि सासू-सासऱ्यांनी आपसात संगनमत करून, लग्नात मनासारखा हुंडा दिला नाही आणि मानपान केला नाही या कारणांवरून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून दीपाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख हे करीत आहेत.
-------------------------------------------------------------------------------------------------
#DowryHarassment #DomesticViolence #WomenSafety #PunePolice #Hadapsar #Justice4Women
Reviewed by ANN news network
on
५/२२/२०२५ ०८:१५:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: