पिंपरी-चिंचवड: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) भाजप महिला मोर्चाने अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथील त्यांच्या ऐतिहासिक जन्मस्थळाला विशेष भेट दिली. महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुजाता पालांडे यांच्या नेतृत्वाखाली हा दौरा आयोजित करण्यात आला होता.
या दौऱ्यात ४२ महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. चौंडी येथे प्रसिद्ध कीर्तनकार शारदाताई मुंढे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची महती सांगणारे प्रेरणादायी कीर्तन सादर केले. कीर्तनात महिलांवरील वाढत्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आणि उपस्थित महिलांनी "महिलांवर अत्याचार होऊ देणार नाही" अशी शपथ घेतली.
भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विजय शिंदे यांच्या संयोजनाने हा दौरा यशस्वीरित्या पार पडला. या दौऱ्यात महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे यांच्यासह रोहिणी मांधरे, स्वाती देशमुख, कविता हिंगे, नीतू भालेराव, दिपाली कलापुरे, मंजू गुप्ता, ज्योती शाह, शोभा थोरात, जयश्री मकवाना, सीमा बोरसे, वैशाली वाखरे, विद्या अहिरे, कविता तांबोरे, सुवर्णा नाझरेकर, पल्लवी मारकड, निता भालेराव आणि रंजना जगताप या प्रमुख महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाल्या होत्या.
या दौऱ्याच्या माध्यमातून अहिल्यादेवी होळकर यांच्या महान कार्याला आदरांजली वाहण्यात आली आणि महिला सक्षमीकरण आणि संरक्षणाचा संकल्प पुन्हा एकदा दृढ करण्यात आला.
-----------------------------------------------------------------------------------------------
#PimpriChinchwad #AhilyadeviHolkar #BJP #MahilaMorcha #Chondi #WomenEmpowerment #SocialAwareness #Maharashtra #CulturalEvent #HistoricalVisit

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: