बुधवार, २८ मे, २०२५

उरण ते कन्नूर प्रवासात कारला आग, कुट्टी कुटुंब बचावले

 

उरण: उरणहून केरळला जात असताना एका कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. सुदैवाने, कारमधील सर्व सदस्य सुखरूप बचावले.

मिळालेल्या माहितीनुसार, उरण तालुक्यातील बोरी पाखाडी, हुसेन मंजिल येथे राहणारे इक्बाल अहमद कुट्टी, त्यांची पत्नी रुबीना इक्बाल कुट्टी, मुली नोफ इक्बाल कुट्टी आणि अजीझा इक्बाल कुट्टी आणि मुलगा उमर इक्बाल कुट्टी हे २१ मे रोजी आपल्या कारने प्रवासाला निघाले होते. त्यांनी रत्नागिरी, गोवा, मंगलोर असा प्रवास केला. २३ मे २०२५ रोजी सकाळी ५:३० वाजता त्यांची मारुती एर्टिगा (MH 46 CV 6557) कार कासारगोडमधील चरकला येथे असताना, अचानक कारमधून धूर येऊ लागला.

कार रुबीना इक्बाल कुट्टी चालवत होत्या. धूर येताच त्यांनी लगेच कार बाजूला थांबवली. कारमधून धूर येत आहे हे लक्षात येताच, सर्वजण तातडीने बाहेर पडले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. मात्र, आगीत कारचे मोठे नुकसान झाले.

या घटनेनंतर, इक्बाल अहमद कुट्टी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कासारगोड जिल्ह्यातील विद्यानगर पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी कलम ३०६(१)(C)(FA) अंतर्गत एफआयआर (FIR) दाखल केला आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास पोलीस करत आहेत.

------------------------------------------------------------------------------------------

#CarAccident #Fire #Travel #Maharashtra #Kerala

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा