सोमवार, १९ मे, २०२५

चाकू हल्ला आणि मारहाणीच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद

 


दत्ता पाटील उर्फ शेरु आणि मनीष साहू गजाआड

मुंबई: विनोबा भावे नगर, कुर्ला पोलिसांनी एका गंभीर गुन्ह्यातील दोन सराईत आरोपींना ठाणे जिल्ह्यातील डोंगरीपाडा जंगल परिसरातून अटक केली आहे. १३ मे, २०२५ रोजी रात्री ११:३० च्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रिक्षाचे पैसे देऊन घरी परत येत असताना परिसरातील सराईत आरोपी दत्ता मंगेश पाटील उर्फ शेरु आणि महेश कृष्णा महाराणा उर्फ पांडा यांनी त्यांना विनाकारण धक्काबुक्की केली आणि शिवीगाळ केली. आरोपींनी फिर्यादीला मारहाण करून जखमी केले.

भांडण सोडवण्यासाठी फिर्यादीचे भाऊजी आणि वडील आले असता, शेरुने भाऊजीच्या उजव्या हातावर चाकूहल्ला केला, तर पांडाने फिर्यादीच्या वडिलांना जीवे मारण्याच्या उद्देशाने छातीवर वार करून गंभीर जखमी केले. तसेच, प्रतिक प्रवीण सकपाळ आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांनी फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि चाकूसारख्या हत्याराने लोकांना धमकावून जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९३/२०२५, कलम ३०७, ३२६, ३२४, ३२३, ५०४ भा.द.वि. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याच्या तपासासाठी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, माहीम, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात दोन पथके तयार करण्यात आली. या पथकांनी अथक प्रयत्न करून गुन्ह्यातील दोन मुख्य आरोपी, दत्ता मंगेश पाटील उर्फ शेरु (वय ३०) आणि मनीष सनातन साहू उर्फ चिंटू (वय २४) यांना डोंगरीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे येथील जंगल परिसरातून अटक केली. पुढील तपास अजून चालू आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त  देवेन भारती, सह पोलीस आयुक्त   सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त  अनिल पारसकर, पोलीस उप आयुक्त  गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक पोलीस आयुक्त   संभाजी मुरकुटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र श्रीरसागर, पोलीस निरीक्षक गुन्हे   शिवानंद देवकर, सपोनि नेवसे, पोउपनि अमर चेडे, पो.ह. गांगुर्डे, गवारे, पो.शि. सांगळे, परदेशी, महाजन, पाटील, मालगुंडे, विशे, उगले व पथकाने केली आहे.

---------------------------------------

#MumbaiCrime #Kurla #Thane #Arrest #CrimeNews #महाराष्ट्र #गुन्हेगारी #मुंबई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा