सोमवार, १९ मे, २०२५

पिंपळे निलखमध्ये मारामारी, अज्ञात हल्लेखोरांनी चालकाला बेदम मारले

 


भरत पेट्रोल पंपाजवळची घटना, चारचाकी चालकाला चौघांकडून मारहाण

पुणे: पिंपळे निलख येथे भरत पेट्रोल पंपाजवळ एका चारचाकी चालकाला अज्ञात व्यक्तींनी मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उदित राजेंद्रकुमार गोस्वामी हे त्यांच्या फिएस्टा गाडीने जात असताना, अॅक्टिव्हा दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना ओव्हरटेक केले. फिर्यादीने त्यांना 'तुम्ही डाव्या बाजूने का ओव्हरटेक करत आहात?' असे विचारले असता, त्यांनी फिर्यादीसोबत वाद घातला आणि मारहाण सुरू केली.

त्यानंतर, दुचाकीवरील हल्लेखोरांनी त्यांच्या दोन मित्रांना बोलावले. त्यांचे मित्र मोपेड दुचाकीवरून आले आणि चौघांनी मिळून फिर्यादीला हाताने व धारदार हत्यारांनी मारहाण केली, ज्यामुळे ते जखमी झाले.

या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार सुतार या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपी अद्याप फरार आहेत.

------------------------------------------------

#PuneCrime #RoadRage #Assault #Violence #CrimeNews #Maharashtra #पुणे #गुन्हेगारी


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा