रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात 17 मे ते 16 जून 2025 या कालावधीत ड्रोन किंवा इतर कोणतीही मानवरहित हवाई वाहने परवानगीशिवाय चालविण्यास किंवा उड्डाण करण्यास किंवा वापरण्यास मनाई करण्यात आली आहे, असा आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिला आहे
जिल्ह्यात काही असामाजिक तत्वांकडून ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई वाहने (यूएव्ही) वापरले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या ठिकाणांना धोका निर्माण होऊ शकतो आणि सार्वजनिक शांतता बिघडू शकते. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये ड्रोन किंवा इतर कोणतेही मानवरहित हवाई वाहने परवानगीशिवाय चालविण्यास किंवा उड्डाण करण्यास किंवा वापरण्यास मनाई करण्यात येत आहे
--------------------------------------------
#Ratnagiri #DroneBan #Maharashtra #PublicSafety #UAV
Reviewed by ANN news network
on
५/१७/२०२५ ०४:५५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: