पुणे: खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला लातूरमध्ये अटक

 


पुणे शहरातील फुरसुंगी पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखेने लातूर येथून अटक केली आहे.

10 मे 2025 रोजी फुरसुंगी परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. मृताच्या चेहऱ्यावर आणि डोक्यात गंभीर जखमा होत्या. त्याची ओळख पटल्यानंतर तो हनिफ मुसा शेख (वय ३० वर्षे, रा. कृष्णानगर, महंमदवाडी, पुणे) असल्याचे समजले.

गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला. जवळपास ५० सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी आसिफ युनूस शेख (वय २५ वर्षे, रा. सय्यदनगर, हडपसर पुणे) हा लातूरमध्ये असल्याची माहिती मिळाली.

गुन्हे शाखेच्या पथकाने लातूरला जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीने जुन्या वादातून खून केल्याची कबुली दिली. 

--------------------------------

#Pune

#Murder

#Crime

#Maharashtra

#Police

पुणे: खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला लातूरमध्ये अटक पुणे: खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला लातूरमध्ये अटक Reviewed by ANN news network on ५/१५/२०२५ ११:५२:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".