पुणेकरांनी अनुभवली 'सहेला रे' गानमैफलीची स्वरमयी संध्या

 


'सहेला रे' गानमैफलीला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद

पुणे: भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'कलाश्री' प्रस्तुत 'सहेला रे' या गानमैफलीने पुणेकरांना मंत्रमुग्ध केले. भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात सायंकाळी रंगलेल्या या कार्यक्रमाला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

या मैफलीत सुप्रसिद्ध गायिका डॉ. राधिका जोशी आणि गायक अभिषेक काळे यांनी भारतरत्न पं. भीमसेन जोशी आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या अजरामर रचना अत्यंत तन्मयतेने सादर केल्या. डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांच्या प्रभावी निवेदनाने कार्यक्रमाला एक खास रंगत आणली.

भारतीय विद्या भवनचे सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. त्यांनी कलाकारांचा ज्ञानेश्वरीची प्रत आणि प्रशस्तिपत्रक देऊन यथोचित सत्कार केला.

डॉ. राधिका जोशी यांनी राग भूपमधील 'सहेला रे' या सुंदर रचनेने मैफिलीची सुरुवात केली. त्यानंतर अभिषेक काळे यांनी 'कलाश्री', 'राम रंगी', 'माझे माहेर पंढरी', 'जमुना के तीर' आणि 'भाग्यदा लक्ष्मी बारम्मा' यांसारख्या विविध रचना सादर करून श्रोत्यांना आनंदित केले. डॉ. राधिका जोशी यांनी 'म्हारो प्रणाम', 'जाईन विचारित रानफुल', किशोरीताईंनी स्वरबद्ध केलेली गझल, तसेच 'बोलावा विठ्ठल' आणि 'अवघा रंग एक झाला' यांसारख्या प्रभावी गायनाने रसिकांची मने जिंकली आणि मैफिलीचा समारोप केला.

या संगीत मैफिलीला मालू गावकर (हार्मोनियम) आणि रामकृष्ण करंबेळकर (तबला) यांनी उत्कृष्ट साथसंगत केली, ज्यामुळे कार्यक्रमाची रंगत अधिक वाढली.

'सहेला रे' हा कार्यक्रम भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक उपक्रमांतर्गत आयोजित २४४ वा कार्यक्रम होता. १७ मे २०२५ रोजी सायंकाळी झालेल्या या विनामूल्य कार्यक्रमाचा पुणेकर रसिकांनी पुरेपूर आनंद घेतला.

---------------------------------------------------------------------------------------------

#SahelaRe #MusicConcert #Pune #BharatiyaVidyaBhavan #InfosysFoundation #ClassicalMusic #HindustaniClassicalMusic

पुणेकरांनी अनुभवली 'सहेला रे' गानमैफलीची स्वरमयी संध्या पुणेकरांनी अनुभवली 'सहेला रे' गानमैफलीची स्वरमयी संध्या Reviewed by ANN news network on ५/१८/२०२५ ०८:२०:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".