गुन्ह्यात मदत करण्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; पोलीसावर लाच मागणीचा गुन्हा

 


लातूर : लातूरमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने एका व्यक्तीकडून २५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या भावाविरुद्ध लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी पोलीस नाईक एस. बी. पांढरे (बक्कल नंबर २४०९) यांनी तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांची मागणी केली होती.

तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, २४/०५/२०२५ रोजी शासकीय पंचासमक्ष लाचेची मागणी पडताळण्यात आली, ज्यात पोलीस नाईक पांढरे यांनी २५ हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर, आज दिनांक २९/०५/२०२५ रोजी पोलीस नाईक एस. बी. पांढरे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप अधीक्षक श्री. संंदीप पाटेले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास तात्काळ विभागाशी संपर्क साधावा.

-----------------------------------------------------------------------------------------------------------

#Latur #Corruption #BriberyCase #MaharashtraPolice #ACBAction #Crime

गुन्ह्यात मदत करण्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; पोलीसावर लाच मागणीचा गुन्हा गुन्ह्यात मदत करण्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; पोलीसावर लाच मागणीचा गुन्हा Reviewed by ANN news network on ५/३१/२०२५ ०५:१०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".