चाकणमध्ये अवैध सावकारी उघडकीस, आरोपीवर गुन्हा दाखल

चाकण पोलिसांकडून सावकारी कायद्यान्वये गुन्हा नोंद

पुणे: चाकण येथे एका बांधकाम व्यावसायिकाला अवैधपणे कर्ज देऊन त्याच्याकडून जबरदस्तीने जास्त व्याज वसूल करणाऱ्या सावकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याची वाहनेही जप्त केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीकांत सखाराम वहीले यांनी आरोपी महेश कुंदन परदेशी याच्याकडून ३,४०,०००/- रुपये कर्ज घेतले होते. या कर्जावर दरमहा २ रुपये शेकडा व्याज आकारण्यात आले. फिर्यादीने आरोपीला ५,६७,०००/- रुपये परतफेड केली, तरीही आरोपीने आणखी पैशांसाठी तगादा लावला.

आरोपीने फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्याचा टेम्पो (क्रमांक एम.एच.१४/जे.एल.८४५८) आणि होंडा युनिकॉर्न गाडी (क्रमांक एम.एच.१४/जी.एल. ७७७९) जबरदस्तीने ताब्यात घेतली. पैसे दिल्यावरच गाड्या परत देईल, असे आरोपीने म्हटल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकरणी चाकण पोलिसांनी आरोपी महेश कुंदन परदेशी याच्या विरोधात महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ कलम ३९, ४५ आणि भा.द.वि. कलम ३८६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

--------------------------------------------------------------------------------

 #PuneCrime #MoneyLending #Usury #CrimeNews #Maharashtra #पुणे #गुन्हेगारी #सावकारी

चाकणमध्ये अवैध सावकारी उघडकीस, आरोपीवर गुन्हा दाखल चाकणमध्ये अवैध सावकारी उघडकीस, आरोपीवर गुन्हा दाखल Reviewed by ANN news network on ५/१९/२०२५ ०३:३०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".