उबाठा प्रणित कामगार संघटनेतील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

 

अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड

अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या सदस्य कंपन्यांमधील शेकडो कर्मचाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत (भाजपा) प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांची अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर कर्मचारी संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

इंडिगो, स्पाइसजेट, बीडब्ल्यूएफएस आणि एअर इंडियाच्या कर्मचारी संघटनांच्या सदस्यांनी उबाठा सेनेकडून झालेल्या अन्यायाला कंटाळून भाजपात प्रवेश केल्याचे सांगितले. यावेळी भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते.

यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले की, अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाने जो विश्वास माझ्यावर ठेवला आहे, त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी कामगार हितासाठी मी काम करेन. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास आणि सरकारी योजनांचा लाभ पोहोचवणे या विचारधारेने केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकार काम करत आहे. भाजपाची विचारधारा सर्व कामगारांच्या आयुष्यात बदल घडवू शकते हे दाखवण्यासाठी मी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारत आहे, असे चव्हाण म्हणाले. सर्व कामगारांच्या न्याय्य मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण सदैव सोबत उभे राहू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी कर्मचारी संघाचे कार्याध्यक्ष जितेंद्र राऊत आणि सरचिटणीस सुहास माटे यांनी सांगितले की, एक ते दीड वर्षे दोन राजकीय पक्षांच्या भांडणात कर्मचारी भरडले जात होते. भाजपाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण हेच सर्व कर्मचाऱ्यांना न्याय देऊ शकतील असा विश्वास वाटल्याने आम्ही त्यांची कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय घेतला. सरकार व कामगारांमध्ये संवाद साधून कामगारांच्या समस्या सोडवल्या जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रवेश केलेल्यांमध्ये योगेश आवळे, निशांत गायकवाड, विनोद घोगले, प्रशांत वर्तक, हर्षित तासकर, दिनेश शेवाळे, करण कांबळे, धनंजय कांबळे, संजय राम बहादुर सिंग, युवराज ढोरे, अक्षय काळभोर, अजित आचरेकर, उमेश डाफळे, सतीश बांदल, सुधीर पवार, राजेश पाटील, महेश पवार, महेश मोरे, आदित्य महेश मोरे, संजय चावणेकर आदींचा समावेश आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------

#Maharashtra #Mumbai #BJP #TradeUnion #Workers #Politics #RavindraChavan #भाजपा

उबाठा प्रणित कामगार संघटनेतील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश उबाठा प्रणित कामगार संघटनेतील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश Reviewed by ANN news network on ५/२७/२०२५ ०७:१६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".