सोमवार, १९ मे, २०२५

पुणे: लष्कर विभागात 'नो पार्किंग'चे नवे नियम

 


महात्मा गांधी रोड, दोराबजी चौकात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना

पुणे, १७ मे २०२५: पुणे शहर वाहतूक शाखेने लष्कर विभागातील काही प्रमुख रस्त्यांवर तात्पुरत्या स्वरुपात 'नो पार्किंग' आदेश जारी केले आहेत. महात्मा गांधी रोड, दोराबजी चौक आणि ईस्ट स्ट्रीट रोडवर वाहनचालक अनेकदा गैरसोयी आणि दुहेरी पार्किंग करत असल्याने वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या अधिसूचनेनुसार मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६(१) (ए) (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

पोलिसांनी खालीलप्रमाणे तात्पुरते बदल केले आहेत:

  • १) वाय जंक्शन ते ट्रायलक हॉटेल: या रस्त्यावर कोणत्याही प्रकारची पार्किंग व्यवस्था उपलब्ध असणार नाही.
  • २) ट्रायलक हॉटेल ते इंदिरा गांधी चौक: या रस्त्यावर कोणत्याही प्रकारची पार्किंग व्यवस्था उपलब्ध असणार नाही.
  • ३) इंदिरा गांधी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतला: या रस्त्यावर कोणत्याही प्रकारची पार्किंग व्यवस्था उपलब्ध असणार नाही.
  • ४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतला ते सेंट मेरी चर्च: या रस्त्यावर कोणत्याही प्रकारची पार्किंग व्यवस्था उपलब्ध असणार नाही.
  • ५) सेंट मेरी चर्च ते इंदिरा गांधी चौक: या रस्त्यावर कोणत्याही प्रकारची पार्किंग व्यवस्था उपलब्ध असणार नाही.

या संदर्भात, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, या बदलांविषयी काही सूचना असल्यास, १७ मे २०२५ ते ३१ मे २०२५ पर्यंत वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयात लेखी स्वरूपात कळवण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक सेवांतील वाहने (उदा. अग्निशमन दल, पोलीस वाहने, रुग्णवाहिका) वगळता, नागरिकांच्या सूचना व हरकती विचारात घेऊन अंतिम आदेश काढण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

------------------------------------------------------------------------------------------------------------

#Pune #Traffic #NoParking #Rules #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा