पुणे, २५ मे २०२५: दिघी येथील अलंकापुरम रोडवर मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने सापळा रचून २५ वर्षीय तरुणाला ११.०३ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) या अंमली पदार्थासह अटक केली आहे. आरोपीचे नाव समीर सलीम खान (वय २५ वर्षे, रा. गावठाण, पुणे) असे आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक मोबाईल आणि होंडा ॲक्टिव्हा दुचाकी असा एकूण २,०५,३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
२३ मे २०२५ रोजी रात्री ८:१५ वाजण्याच्या सुमारास अलंकापुरम रोडवरील साईदीप लॉजजवळ, ९० मीटर रोडवरील मोकळ्या जागेत पोलिस शिपाई अमर शांताराम कदम (मालमत्ता गुन्हे विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड) यांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला. या कारवाईदरम्यान आरोपी समीर खान याला ताब्यात घेण्यात आले. तपासात त्याच्याकडे ११.०३ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) हा अंमली पदार्थ तसेच एक मोबाईल आणि होंडा ॲक्टिव्हा दुचाकी आढळली. आरोपी हा अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगत असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक कटपाळे करत आहेत.
----------------------------------------------------------------------------------------------------------
#Pune #DrugTrafficking #NDPSAct #Mephedrone #DighiPolice #Arrested #CrimeBranch #PuneCrime #IllegalDrugs #DrugBust
Reviewed by ANN news network
on
५/२५/२०२५ ०७:००:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: