गोदरेजने पुण्यात सादर केली BIS प्रमाणित स्मार्ट सुरक्षा लॉकरची नवीन श्रेणी



पुणे, दि. २९ मे २०२५ – आधुनिक तंत्रज्ञान आणि डिझाईनचा सुरेख संगम साधत गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपने पुण्यात स्मार्ट गृह सुरक्षा उपायांची नवीन श्रेणी सादर केली. बदलत्या जीवनशैलीनुसार वाढत्या सुरक्षेच्या गरजा लक्षात घेऊन ही उत्पादने सादर करण्यात आली आहेत.

गोदरेज सुरक्षा व्यवसायाचे प्रमुख पुष्कर गोखले यांनी माहिती दिली की, “स्मार्ट सिटी बनणाऱ्या पुण्यात सुरक्षेचे स्वरूपही आता बदलत आहे. केवळ संरक्षण नव्हे तर जगण्याच्या पद्धतीत बदल घडवणारे हे उपाय आहेत.”

गोदरेजने नव्या श्रेणीत NX Pro Slide, NX Pro Luxe, Rhino Regal, NX Seal, तसेच MX पोर्टेबल स्ट्रॉन्ग रूम, AccuGold iEDX, आणि ऑरम प्रो रॉयल यांसारखी उत्पादने समाविष्ट केली आहेत. ही उत्पादने ड्युअल मोड एक्सेस, बायोमेट्रिक लॉकिंग, अलार्म सिस्टम, आणि BIS मानकांची पूर्तता करतात.

सुरक्षेचा प्रमुख बाजार म्हणून पुण्यावर लक्ष केंद्रित करत कंपनीने येत्या तीन वर्षांत १८% वार्षिक वाढ साधण्याचा आणि गृह लॉकर विभागात ८०% बाजार हिस्सा मिळवण्याचा उद्देश ठेवला आहे. दागिने विभागात ७०% हिस्सा मिळवण्याचे लक्ष्य आहे.

सोन्याच्या वाढत्या किंमतींचा आणि ग्राहकांच्या जुन्या दागिन्यांच्या अदलाबदलीमुळे वाढलेल्या पुनर्नूतनीकरण बाजाराचा विचार करता, सुरक्षित लॉकर आणि ज्वेलर्ससाठी खास सुरक्षा प्रणाली आवश्यक बनली आहे. यासाठी गोदरेजने BIS प्रमाणित सुरक्षित उत्पादने जसे ऑरम प्रो रॉयल आणि सोन्याच्या शुद्धतेसाठी AccuGold iEDX ही उत्पादने सादर केली आहेत.

पुणेतील आणि महाराष्ट्रातील टियर २ व ३ शहरांमध्ये कंपनीचा विस्तार वेगाने होत असून डिजिटल संपर्क व किरकोळ नेटवर्क बळकट करण्यावर भर दिला जात आहे. “संपूर्ण राज्यभर सुरक्षिततेचे भवितव्य घडवण्याचे आमचे ध्येय आहे,” असे गोखले यांनी सांगितले.

-------------------------------------------------------------------------------------------------------------#GodrejSecurity #PuneLaunch #SmartLockers #SecureLiving #BISCertified #DefenderOrumPro #AccuGoldiEDX #GoldSafety #SmartHomes #GodrejInnovation

गोदरेजने पुण्यात सादर केली BIS प्रमाणित स्मार्ट सुरक्षा लॉकरची नवीन श्रेणी गोदरेजने पुण्यात सादर केली BIS प्रमाणित स्मार्ट सुरक्षा लॉकरची नवीन श्रेणी Reviewed by ANN news network on ५/३०/२०२५ ०७:३०:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".